चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील डॉ. बी. आर. पाटील (वय -६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा मुलगी, भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. ते चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष होत. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवण्यात आले. तसेच चंदगड तालुका पंचायत समितीच्या माजी सदस्या शुभांगी पाटील, बेळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) अडत व्यापारी शिवाजी पाटील यांचे ते भाऊ होत. त्यांच्या निधनामुळे चंदगड तालुका मेडिकल असोसिएशन तर्फे शोक व्यक्त करण्यात आला.

No comments:
Post a Comment