कोवाड येथे 'ब्रम्हांडनायक, दीनांचा कैवारी' चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

23 January 2026

कोवाड येथे 'ब्रम्हांडनायक, दीनांचा कैवारी' चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

   साहित्य तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणाऱ्या कोवाड (ता. चंदगड) येथे नुकताच 'ब्रम्हांडनायक, दीनांचा कैवारी' चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ करण्यात आला. निर्माता राजेंद्र जैन यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सेने अभिनेते भोजराज होते. यावेळी जीवन कुंभार, गुलाब पाटील, एम. एन. पाटील, कविता भीमाना रोकडे, उपसरपंच पुंडलिक जाधव, महादेव सांबरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

  कोवाड नेसरी रोडवरील एम. एन. पाटील यांच्या कृषिधन निवासस्थान व परिसरात शूटिंग करून शुभारंभ करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच कोवाड येथे या चित्रपटातील भुमिकांसाठी चंदगड तालुक्यातील कलाकारांचे ऑडिशन घेण्यात आले होते. त्यातून काही कलाकारांची निवड चित्रपटातील भूमिकांसाठी झाली आहे. क्रिएशन प्रस्तुत या चित्रपटाचे ऑडिशन व शुभारंभ कोवाड येथे घडवून आणण्यासाठी निट्टूर येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा बामणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हा लघुचित्रपट कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, कॅमेरामन अशा सर्व टीमच्या कष्टामुळे सुपरहिट ठरेल अशी आशा बामणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. 

 शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या चंदगड तालुक्यातील व बाहेरील कलाकारांसोबत निर्माता कुमार जाधव, राजेंद्र जैन, लेखक गजेंद्र कोठावळे, कवी गीतकार युवराज पाटील, कॅमेरामन संतोष बाचीकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment