तीन हजार रुपयांच्या लाचेप्रकरणी खासगी इसमाला रंगेहाथ पकडले, लाचलुचपत विभागाची कारवाई, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू - चंदगड लाईव्ह न्युज

22 January 2026

तीन हजार रुपयांच्या लाचेप्रकरणी खासगी इसमाला रंगेहाथ पकडले, लाचलुचपत विभागाची कारवाई, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू

 

संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    संपूर्ण गटाची मोजणी करणे करीता व हददी ठरविण्यासाठी कार्यालयातील मोजणी करणा-यांना पाठवतो व मोजणी झालेला फायनल नकाशा काढुन देणेसाठी ३ हजार रुपयांची लाचेची मागणी करुन स्विकारताना विजय आप्पासाहेब कानडे  (वय ३२ वर्षे, खाजगी इसम, रा. बाळगुंदी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) याला रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत विभागाच्या पथकाने चंदगड तालुक्यात हि कारवाई केली. 

    यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडून मिळालेली माहीती अशी की, ``तक्रारदार यांचे वडील त्यांचे शेतजमीनीचे गटाची मोजणी करून नकाशा मिळणेसाठी भूमिअभिलेख कार्यालय, चंदगड येथे रितसर अर्ज केला होता. केले अर्जाप्रमाणे तक्रारदार यांचे संपूर्ण गटाची मोजणी करणे करीता व हददी ठरविण्यासाठी कार्यालयातील मोजणी करणा-यांना पाठवतो व मोजणी झालेला फायनल नकाशा काढुन देणेसाठी विजय कानडे, (भूमि अभिलेख कार्यालय चंदगड येथे सप्टेंबर २०२५ पर्यंत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणुन कार्यरत असणारे तसेच त्यानंतर भूमि अभिलेख कार्यालय चंदगड कार्यरत नसताना तेथे कार्यरत आहे असे भासवुन) यांनी भूमि अभिलेख कार्यालय चंदगड येथील अधिकारी कर्मचारी हे ओळखीचे आहेत. त्यांचेकडुन मोजणीचे काम करून देतो. तसेच मोजणी झालेनंतर फायनल नकाशा देणेसाठी तक्रारदार पाटील यांचेकडे यापुर्वी ८,०००/-रूपयांची मागणी केल्याचे तसेच यापुर्वी तक्रारदार यांचेकडुन पैसे घेतल्याचे तसेच आता राहीलेले ३,०००/- रूपये लाचेची केली. म्हणुन तकारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे तकार दिली होती.

        तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे दिलेल्या तक्रार अर्जाप्रमाणे पडताळणी केली असता, पडताळणीमध्ये तक्रारदार यांचेकडे विजय कानडे यांनी, त्यांची शेतजमीनीची मोजणीचे अनुषंगाने बोलणे करून, रेकॉर्ड दाखवतो, मोजून येवून, कस बसतय, काय बसतयं असे म्हणुन तक्रारदार यांचेकडे यापुर्वी ८,०००/- रूपयांची मागणी केल्याचे तसेच यापुर्वी तक्रारदार यांचेकडुन पैसे घेतल्याचे तसेच आता राहीलेले ३,०००/- रूपयांची बेकायदेशिरपणे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

        त्यानुसार सापळा कारवाई आयोजीत केली असता, पंच साक्षीदारांचे समक्ष तक्रारदार यांचेकडुन आरोपी विजय आप्पासाहेब कानडे, वय ३२ वर्षे, खाजगी इसम, रा. बाळेगुंदी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर यांनी ३,०००/-रूपये लाच स्विकारलेने, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सदरबाबत आरोपी विजय आप्पासाहेब कानडे, वय-३२ वर्षे, खाजगी इसम, रा. बाळेगुंदी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर यांचेविरूध्द चंदगड पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

        शिरीष सरदेशपांडे (पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे), अर्जुन भोसले (अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे) यांचे मार्गदर्शनानुसार राजेंद्र सानप (पोलीस निरीक्षक), पो.हे.कॉ. विकास माने, पो.हे.कॉ. संदिप काशीद, पो.ना.सचिन पाटील, पो.कॉ. कृष्णा पाटील, अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी केली आहे. 

लाचलुचपत विभागाच्या वतीने आवाहन

        लाचेच्या अथवा अपसंपदे बाबतच्या तक्रारी असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हेल्पलाईन टोल फ्री १०६४ कंमाकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment