चंदगड : सी एल वृत्तसेवा
दि महाराष्ट्र एज्युकेशन अँड स्पोर्ट्स ॲकडमी संचलित तुर्केवाडी येथील महादेवराव बी. एड कॉलेजच्या वतीने शालेय आंतरवासिता कार्यक्रम टप्पा १ नुकताच बसर्गे ता. चंदगड येथे संपन्न झाला. येथील भावेश्र्वरी विद्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका सौ. एस. जे. पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. जे. कोकितकर होते. यावेळी मार्गदर्शक प्रा. वाय. पी. पाटील व प्रा. एम. आर. मुल्ला. उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एड. प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी २०२५-२६ याच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे नियोजन राजश्री शाहू गट क्रमांक ३ च्या प्रशिक्षणार्थीनी नेटकेपणाने केले. शालेय वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा आणि अध्यापन कौशल्याचा विकास व्हावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment