चंदगड - येथे नायब तहसिलदार डी. एम. नांगरे यांना मागण्यांचे निवेदन देताना हेरे विद्यालयाचे विद्यार्थ्यी व पालक. |
हेरे (ता. चंदगड) येथील सह्याद्री विद्यालयाच्या शाळेलगत शाळेच्या जागेत अतिक्रमण मोकळी करण्यात आले. पण या मराठी शाळेच्या जागेत कोणतेही अतिक्रमण सिद्ध न करता अतिक्रमण काढण्याचे आदेश चंदगड तहसिलदार यांनी दिल्यानंतर मंडळ अधिकारी ग्रामपंचायतीच्या मदतीने तातडीने अंमलबजावणी केली. याला विरोध म्हणून पालक व विद्यार्थ्यींनी तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.
निवेदनात म्हटले आहे की, ``हेरे येथे सह्याद्री विद्यालयाचे वर्ग चालू असताना धूळ उडाली, ध्वनी प्रदूषण झाले, झाडे कोसळली, क्रीडांगण उध्वस्त केले. शाळेच्या मुलांनी लावलेली झाडे लागवड करून जतन केलेली होती, ती पाडण्यात आली. शाळा इमारतीच्या उत्तरेला दगड मातीचे मोठे ढिगारे निर्माण करून भविष्यात शाळेला धोका निर्माण केला. तीव्र उताराचा धोकादायक रस्ता निर्माण केला. स्वच्छतागृहाकडे जाण्याची गैरसोय केली. परीक्षा जवळ आलेली असताना हा सगळा गोंधळ चालु झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास अडचणी येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध म्हणून अभिनंदन करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून अनोख्या पध्दतीने शासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी तहसिल कार्यालयाच्या पायरीवर फुले ठेवून विरोध दर्शविला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार डी. एम. नांगरे यांना देण्यात आले.
ग्रामपंचायतीचा खुलासा
हेरे गावठाणचा विस्तार करण्यासाठी गट नं. 750 व 755 सरकारी पड म्हणून मंजूर झाली होती. तहसिलदार यांच्या आदेशाने नगर रचनेचा लेआऊट नकाशा प्रमाणे तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही गट नंबरमधील सपाटीकरण अंतर्गत रोड व 275 लॅॉट चे काम चालू आहे. सह्याद्री विद्यालय हि खासगी संस्था शिक्षण असून विद्यार्थ्यांचे भवितव्य डोळ्यासमोर ठेवून सन 1986/87 मध्ये ग्रामपंचायतीकडून गट नं. 750 मधील 46 गुंठे जागा दिली होती. पण शाळेने 46 गुंठे सोडून 750 मधील 40 गुंठे जागेत अतिक्रमण केले आहे. यामध्ये मुला-मुलींसाठी मुतारी, बोअरवले व गाड्या पार्कींगसाठी वापरत आहेत. या जागेवर तहसिलदार यांनी स्वत: येवून प्रशासन व मुख्याध्यापक यांना बोलावून अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. पण अतिक्रमण काढले नाही. हि बाब तहसिलदार यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना बोलावून रीतसर नोटीस देवून स्वत: उभारुन अतिक्रमण काढण्यास सुरवात केली. यावेळी शिक्षकांनी शाळेतील मुले जे. सी. बी. समोरु आणून गोंधळ घातला. यावेळी तहसिलदार यांनी पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढले आहे. मात्र ग्रामपंचायत हेरे व गावठाण वाढ समिती हेरे यांची बदनामी करण्याचा हेतु असल्याचे प्रसिध्दीपत्रक ग्रामपंचायतीच्या वतीने प्रसिध्दीला दिले आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment