सुत्रींचा लेखापरिक्षकांनी स्विकार करावा - प्रा, एस. के. सावंत - चंदगड लाईव्ह न्युज

15 February 2019

सुत्रींचा लेखापरिक्षकांनी स्विकार करावा - प्रा, एस. के. सावंत


चंदगड / प्रतिनिधी
देशाच्या विकासामध्ये सनदी लेखापरीक्षक यांचे योगदान फार मोठे असुन लेखाशास्त्र तत्वप्रणाली व नियमावली तसेच प्रमाणिकपणा या त्रिसुत्रींचा लेखापरीक्षकांनी स्विकार करावा असे आवाहन प्रा. एस. के. सावंत यांनी केले. ते राजमाता महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसनस्थे मार्फत आयोजित महेश लक्ष्मण भातकांडे यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या चेअरमन सौ. सुजाता सातवणेकर होत्या.  
प्रास्ताविक व्यवस्थापक नंदकुमार घोरपडे यांनी केले. प्रा. सावंत पुढे म्हणाले, ``चंदगड सारख्या दुर्गम ग्रामीण भागात सर्वसामान्य विध्यार्थीही लेखाशास्त्र, लेखापरीक्षण या क्षेत्राकडे वळत आहेत. त्यामुळे भविष्यात लेखापरीक्षकांची संख्या वाढेल यात शंकाच नाही, असे सांगुन ते म्हणाले ``सरकरी व बिगर सरकारी क्षेत्र व्यवस्थानामध्ये प्रामाणिकता जोपासावी असे प्रा. सांवत यांनी सांगितले. यावेळी सी. ए. परिक्षेत नुकताच पास झालेला महेश भातकांडे यांचा सत्कार प्रा. सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. तर ऊर्मिला भातकांडे यांचा सत्कार चेअरमन सुजाता सातवणेकर यांनी केला. यावेळी व्हा. चेअरमन, सौ.रुपाली रेडेकर, सौ.वंदना सावंत, सौ संगिता आजरेकर .सौ सुधाताई सुतार, सौ अस्मिता शेलार, सौ अनिता मांगले, कल्पना कुलकर्णी, ईत्यादी उपस्थित होते. सुत्रसंचालन सौरभ वाजंत्री यांनी केले. आभार श्री. पोशिरकर यांनी मानले.


No comments:

Post a Comment