चंदगड / प्रतिनिधी
काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्यात भारतीय जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला आतंकवाद्याकडून स्फोटके भरलेल्या वाहनाची धडक घडवून आणल्याने यात बेचाळीस जवान दुर्दैवाने मरण पावले. या भ्याड हल्ल्याचा चंदगड तालुक्यातील बेळेभाट या छोट्या गावातील प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आतंकवाद्याचा निषेध व्यक्त केला. शाळेतील सर्व विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात शिक्षकांसमवेत येवुन प्रथम शहीद झालेल्या जवानांना स्तब्धता पाळून सर्वानी भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली. विद्यार्थ्यांनी हातात आतंकवाद्याचा निषेध व्यक्त करणारा फलक धरून घोषणा दिल्या.
No comments:
Post a Comment