सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली 34 मित्रांची भेट, साधला फेस टू फेस संवाद - चंदगड लाईव्ह न्युज

27 April 2020

सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली 34 मित्रांची भेट, साधला फेस टू फेस संवाद

कोवाड मधील १९९३ च्या १० वी बॅचचे मिञ झूम अॅपच्या माध्यमातूम संवाद साधताना.
तेऊरवाडी / प्रतिनिधी (संजय पाटील)
                  सध्या देशभर संचारबंदी लागू आहे. राज्यातील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्याबरोबरच जिल्ह्याअंतर्गत सीमा बंद केल्या आहेत. अशा परिस्थीतीत पूण्या,मुंबई सारख्या ठिकाणी बाहेरगावी असलेले चाकरमानी  अडकुन पडले आहेत. फक्त व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात असतात. एकमेकांना भेटण्याची त्यांची इच्छा असूनही त्याना भेटता येत नसे. शेवटी त्यांनी झूम अँप च्या माध्यमातून एकत्र येत फेस टू फेस एकमेकांशी तबल 3 तास सवांद साधून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा करून दिला.
दरवर्षी एप्रिल व मे महिन्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या व वेगवेगळ्या शहरात नोकरीसाठी असणाऱ्या                                    चाकरमान्याना यावर्षी कोरोणाच्या वाढत्या संसर्गामुळे गावी येण्याच्या इच्छेवर पाणी सोडावे लागले आहे.वर्षातून या दोन महिन्यांच्या टप्यात गावी येऊन कुटुंबाबरोबरच आपल्या बालपणीच्या सवंगड्याबरोबर वेळ घालून जुन्या आठवणी त्याज्या करण्याचे स्वप्नच राहते की काय अशी परिस्थिती आहे.या दोन महिन्यात गावी येऊन वर्षभराच्या आठवणी सोबत घेऊन  पुढील वर्षी च्या मे महिन्याची आस मनात ठेवत पुन्हा हे सर्व मित्र नोकरीच्या ठिकाणी परतत.यावर्षी कोरोणाने संपूर्ण देशासहित राज्यभर विळखा घातला असून त्यांना गावी येणे शक्य होत नसल्याने कोवाड येथील सण 1993 पर्यंत 10 वी च्या वर्गात शिकलेल्या मित्राना एकमेकांना भेटण्याची इच्छा असताना देखील ते भेटू शकत नव्हते. त्यामुळे या सर्वांनी आज रविवारी झूम अँप च्या माध्यमातून एकत्र येऊन अगदी मनसोक्त संवाद साधला आणि जुन्या आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न केला. एकमेकांच्या अडचणी समजून घेतल्या.
                सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला हा ग्रुप आज अशा परिस्थितीत सुद्धा आपलेपण जपण्याचा प्रयत्न करत आहे.यातील अनेकजण  पूना ,मुंबई,गोवा,बेंगलोर,दिल्ली यासारख्या ठिकाणी उच्च पदावर कार्यरत आहेत.पण गावाबाबतची नाळ आजही जोपासत आहेत.मागील वर्षीच्या महापूराच्या प्रसंगी पूरग्रस्त कुटुंबाना मदतीचा हात असो, आपल्या ग्रुप मधील कुणाची अडचण असो वा गावातील सामाजिक कार्य असो अशा अनेक प्रसंगात हा ग्रुप धावून आलेला आहे .अशा वेळी सगळ्यांचच एकमत हे ठरलेलं असत.यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही गरजू कुटुंबाना मदत करण्याच्या मुद्यावर चर्चा करून योग्य वेळी ते आमलात आणण्याचा निश्चय केला. गावातील स्थानिक मित्रांच्या मदतीने गावाबाहेरील मित्र नेहमीच मदत कार्यात सहभागी असतात.
             आजच्या भेटीने मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद हा ओसंडून वाहात असताना दिसत होता.यामध्ये किशोर पाटील,दयानंद वांद्रे,भैया उर्फ प्रताप पाटील,एकनाथ जोशी,अभय जोशी,महेश पाटील,विलास आडाव,विनायक कुंभार,संतोष सूर्यवंशी,सागर पाटील,संजय हेरेकर,सुनील गवेकर,शंकर काकतीकर,विनोंद पाटील,जोतिबा बिर्जे,आप्पा कुट्रे,संजय पाटील,गुरुसिद्ध बुरुड,अशोक मनवाडकर,अजित व्हन्याळकर,खलील अलाखान, तुकाराम पाटील,मारुती वांद्रे,राकेश कारेकर,महंमद मुल्ला,बाळू कांबळे आदी वर्गमित्र आहेत.No comments:

Post a Comment