मलगेवाडी ( ता. चंदगड ) येथे कोरोना सर्वेक्षण करताना पथक. |
तेऊरवाडी / प्रतिनिधी
मलगेवाडी (ता. चंदगड) येथे शासनाच्या आदेशानुसार कोरोना सर्वेक्षण करण्यात येत आहे. कोरोना सर्वेक्षण टिम दररोज वाटून दिलेल्या कुटूंबाना भेट देऊन कुटुंबात, घरात किंवा गावामध्ये बाहेर गावाहून कोण आले आहे का? याची नियमित विचारणा करण्यात येत आहे. हे काम नियमित चालू असून याचा अहवाल शासनाला कळवला जात आहे. या टिममध्ये पोलीस पाटील धोंडिबा पाटील, आरोग्य सेविका सौ. नाईक, आशा सौ. अश्विनी जाधव, महादेव नाईक, अंगणवाडी सेविका श्रीमती निर्मला ताम्हनगोंडे, सौ. महादेवी कबाडे, सौ. लता पाटील यांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment