चंदगड / प्रतिनिधी :
चंदगड पोलीस ठाणे आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग, गडहिंग्लज यांच्या संयुक्त पथकाने डुक्करवाडी (रामपूर), ता. चंदगड येथे गावठी दारू निर्मितीच्या ठिकाणी छापा टाकून २३ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
या संदर्भात पोलिसातील मिळालेली माहिती अशी की, शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे ५५० लिटर रसायन, किंमत १९ हजार २५० रुपये, तसेच १० लिटर गावठी दारू, किंमत १ हजार रुपये, आणि ३ हजार ४५० रुपये किमतीचा इतर मुद्देमाल असा एकूण २३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी संशयित लक्ष्मण आप्पया नाईक (वय ५०, रा. नाईक गल्ली, डुक्करवाडी, रामपूर, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार एच.सी. नाईक सहभागी झाले होते.
याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे एक गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


No comments:
Post a Comment