चंदगड : सी एल वृत्तसेवा
विझणे (ता. चंदगड) येथील शेतकरी चंद्रकांत नारायण शिवणगेकर हे गेल्या ३१ जुलै पासून बेपत्ता झाले आहेत. याबाबतची वर्दी त्यांचे भाऊ संतोष नारायण शिवणगेकर यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत शिवनगेकर(वय ४५) व्यवसाय शेती हे ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी नऊच्या सुमारास घरातून बाहेर पडले. त्यानंतर ते परत न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र त्यांचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नसल्याने त्यांचे बंधू संतोष यांनी चंदगड पोलिसात ठाण्यात चंद्रकांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
चंद्रकांतचे वर्णन - उंची सुमारे ५ फूट १ इंच, वर्ण निमगोरा, सड पातळ बांधा, काळे केस असून अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, पायात काळ्या रंगाच्या चपला असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे वर्णन आहे. याबाबत माहिती मिळाल्यास चंदगड पोलीस ठाणे येथे ९०२१०६२६२४ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment