कालकुंद्री येथील जागृत देवस्थान विरदेव ची यात्रा शुक्रवारी - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2026

कालकुंद्री येथील जागृत देवस्थान विरदेव ची यात्रा शुक्रवारी


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

कालकुंद्री (ता. चंदगड) येथील येथील जागृत देवस्थान श्री विरदेव (वड्डाचा ईर) ची वार्षिक यात्रा शुक्रवार दिनांक ७/८/२०२६ रोजी होणार आहे. दरवर्षी श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी (आषाढ महिन्यातील) शेवटच्या शुक्रवारी ही यात्रा असते. गावातील लग्न करून बाहेरगावी दिलेल्या माहेरवाशीण मुलींचा रक्षण कर्ता म्हणून याबद्दल श्रद्धा आहे. यामुळे बाहेरगावी दिलेल्या माहेरवाशींनी मुली यावेळी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहतात. यंदा या मंदिरचे वर्षीलदार म्हणून संजय कांबळे काम पाहत असून यात्रेच्या निमित्ताने भाविकांनी देवदर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन भरत कांबळे, दत्तू कांबळे, सागर कांबळे, कल्लाप्पा कांबळे व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment