नागनवाडी (ता. चंदगड) येथे शिक्षक व गावातील तरुणांनी भटक्या समाजातील लोकांना जीवनावश्यक वस्तुची मदत केली. |
कोरोणामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन स्थितीमध्ये आहे. या विषाणूच्या भीतीने माणूस माणसापासून दूर जात आहे. या परिस्थितीमध्ये भटक्या समाजातील लोकांच्या हाताला काम नसल्यामुळे सायंकाळी त्यांची चुल पेटत नाही. अशा लोकांनी करायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. यावेळी सामाजिक जाणिवेतून नागनवाडी (ता. चंदगड) येथे रहात असलेले काही शिक्षक व काही होतकरु तरुणांनी वर्गणी काढली. नागनवाडी पेट्रोल पंपाशेजारी रहात असलेल्या भटक्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुचे मोफत वाटप करुन माणुसकी जपली आहे.
कोरोणाच्या या महाभयंकर परिस्थितीमध्ये या भटक्या कुटुंबांच्या हाताला काम नसल्याने खायचे काय असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांची बिकट परिस्थिती पाहून लॉकडाऊन काळात नागनवाडी गावातील काही समाजसेवी शिक्षक आणि काही दानशूर तरुण यांनी या कुटुंबातील गरजुंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. गरिबांना संकटसमयी मदत करावी असे धडे फक्त शाळेत शिकविले जात नाहीत तर हे शिक्षक स्वतः हे विचार आचरणात ही आणतात. हे यावरुन दिसून आले. सर्व शिक्षकांच्या हस्ते या गरीब कुटुंबांना साहित्य देण्यात आले. या भटक्या कुटुंबातील व्यक्तीच्या व लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला. नागनवाडी येथील शिक्षक सुरेश गावडे, देवानंद जगधने, पांडुरंग वांजोळे, सुधाकर माने, रमेश बुरुड, कांता गावडे, प्रशांत मगदूम, अनंत धोत्रे, सचिन शिरगांवकर, संजय ठाकरे, तुकाराम गावडे यासह गावातील दानशूर तरुण स्वप्नील गावडे, अनिल गावडे, विठ्ठल गावडे, परशराम गावडे यांनी ही मदत केली.
No comments:
Post a Comment