
कागणी : ग्रंथवाचन करताना वैजनाथ बाचुळकर. समोर संप्रदाय क्षेत्रातील वारकरी व ग्रामस्थ.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कागणी (ता. चंदगड) येथील ग्रामस्थ व विविध सांप्रदाय मंडळातर्फे सालाबाद प्रमाणे ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिरात श्रावण मास निमित्त सामूहिक ग्रंथ वाचन उत्सवाला प्रारंभ झाला. याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदाचे हे पाचवे वर्ष असून महिनाभर रोज सायंकाळी मंदिरात ८ वाजता हा कार्यक्रम होत आहे. यंदा अध्यात्मिक शिवलीलामृत या ग्रंथाचे सामूहिक वाचन वैजनाथ बाचुळकर करत आहेत. ग्रंथ वाचन कार्यक्रमानंतर कुलस्वामिनी लक्ष्मी भजन मंडळ, जोतिबा सासनकाठी भजन मंडळ, समतानगर भजन मंडळ यांच्या वतीने सामूहिक भजन सादर केले जात आहे. या धार्मिक कार्यक्रमांमध्ये गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
No comments:
Post a Comment