शांततापूर्ण गणेशोत्सवासाठी चंदगड पोलिसांचे नियोजन, ४ सप्टेंबर रोजी चंदगड येथे समन्वय बैठकीचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2026

शांततापूर्ण गणेशोत्सवासाठी चंदगड पोलिसांचे नियोजन, ४ सप्टेंबर रोजी चंदगड येथे समन्वय बैठकीचे आयोजन

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

  चंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी, नागरिक, ग्रामस्थ, मान्यवर व संबंधित घटकांच्या समन्वयाने आगामी 'गणेशोत्सव २०२६' शांततेत, सुव्यवस्थित व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्याचे नियोजन चंदगड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. या अनुषंगाने शुक्रवार दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता चंदगड येथील रवळनाथ मंदिर हॉल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

  या बैठकीस गडहिंग्लज उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, चंदगड चे पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे मार्गदर्शन करणार आहेत. 

   गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, शांतता, वाहतूक नियोजन, मंडळांचे नियोजन तसेच उत्सव काळातील विविध बाबींवर बैठकीत चर्चा होणार आहे. गणेश मंडळे, प्रशासन व नागरिक यांच्यातील समन्वयातून उत्सव सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात पार पाडण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

   या महत्त्वपूर्ण बैठकीस चंदगड चे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, तालुक्यातील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस पाटील, शांतता समितीचे पदाधिकारी, उद्योजक, नागरिक संघटना, गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, डॉल्बी चालक-मालक, डिजिटल मीडिया प्रतिनिधी, पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे. असे आवाहन करताना “एकत्र येऊया, जबाबदारी स्वीकारूया; गणेशोत्सव आनंदाचा, शांततेचा व सुरक्षिततेचा बनवूया,” असा भावनिक संदेश या निमित्ताने चंदगड पोलीस विभागाने दिला आहे. 

No comments:

Post a Comment