ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत सानवी पाटीलचे सुयश - चंदगड लाईव्ह न्युज

27 April 2020

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत सानवी पाटीलचे सुयश

सानवी रामचंद्र पाटील
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील कन्या विद्यामंदिर इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी सानवी रामचंद्र पाटील हिने राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत 100 पैकी 96 गुण मिळवून गोल्ड मेडल मिळवले आहे. त्याचबरोबर जानेवारी 2020 मध्ये घेण्यात  आलेल्या मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत 300 पैकी 276 गुण मिळवत तिने कोल्हापूर जिल्ह्यात सहावा क्रमांक तर राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत 13 वा क्रमांक मिळवला. चंदगड तालुक्यात सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. सेनापती प्रतापराव गुजर सामान्य ज्ञान परीक्षेत 100 पैकी 92 गुण मिळवून तिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. भाषा विकास संस्था कोल्हापूरतर्फे आयोजित स्वछंद प्रज्ञाशोध परीक्षेतही तिने गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. तिला वर्गशिक्षक रमेश बुरुड व मुख्याध्यापिका  गोरुले यांचे मार्गदर्शन लाभले. केंद्रप्रमुख सुभाष सावंत व गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार यांनी प्रोत्साहन दिले. 


No comments:

Post a Comment