अवंतिका शिंदेचे ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत यश - चंदगड लाईव्ह न्युज

28 April 2020

अवंतिका शिंदेचे ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत यश

अवंतिका विनायक शिंदे
नेसरी  (प्रतिनिधी) 
नेसरी येथील कन्या विद्या मंदिर शाळेची इयत्ता दुसरीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी अवंतिका विनायक शिंदे हिने गोरे एज्युकेशन फौंडेशनमार्फत झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्काॅलरशिप परीक्षा २०२० मध्ये १०० पैकी ९२ गुण मिळवून सिल्व्हर मेडल प्राप्त केले. तिला वर्ग शिक्षिका अश्विनी रेडेकर, सुमन गवेकर, रवळू पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तर मुख्याध्यापिका सुजाता पाटील, पालक डाॅ. विनायक शिंदे, डाॅ. शिल्पा शिंदे यांचे प्रोत्साहन मिळाले. 

No comments:

Post a Comment