चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कृषी विभाग राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान पौष्टिक तृणधान्य सण २०२५-२६ अंतर्गत तालुकास्तरीय शेतकरी कार्यशाळा व पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा शनिवार दि. १४ मार्चे २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता नागणवाडी (ता. चंदगड) येथील हनुमान मंदिर येथे आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील रहातील.
कार्यक्रमाला कोल्हापूर विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, कोल्हापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा जालिंदर पांगरे, गडहिंग्लज उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
मृदा शास्त्रज्ञ व सेंद्रिय शेतीतज्ञ शांतीकुमार पाटील, कोल्हापूर विभागीय कृषी संशोधन केंद्र कनिष्ठ पैदास कार नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्पाचे योगेश बन हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाचे नियोजन चंदगड, तुर्केवाडी व कोवाड येथील मंडल कृषी अधिकारी यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

No comments:
Post a Comment