ग्राम रोजगार सेवक संघटना चंदगड शाखेच्या वतीने विविध मागण्यांसाठी एप्रिल महिन्यापासून कामावर बहिष्काराचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

12 March 2026

ग्राम रोजगार सेवक संघटना चंदगड शाखेच्या वतीने विविध मागण्यांसाठी एप्रिल महिन्यापासून कामावर बहिष्काराचा इशारा

नायब तहसिलदार यांना निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी

चंदगड / प्रतिनिधी

     ग्रामरोजगार सहाय्यकांचे पगारासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वारंवार मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास १ एप्रिल २०२६ पासून चंदगड तालुका ग्रामरोजगार सहाय्यक VBG-RAM-G कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन चंदगड तालुका ग्रामरोजगार सहाय्यक यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दिले आहे. आपल्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देण्यासाठी चंदगड तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सहाय्यक उपस्थित होते.

गटविकास अधिकारी यांना निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी

चंदगड तालुका ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मागण्या खालीलप्रमाणे......

1) ३ ऑक्टोंबर २०२४ च्या जीआर नुसार ग्रामरोजगार सहाय्यकांना ८,०००/- हजार पगार मिळावा.

2) ग्रामपंचायत कमिटी बोर्डावर नांव नमुद करणे.

3) कार्यालयानी कामे करणेसाठी इंटरनेट पॅक मिळावा.

4) शासनाकडून मिळालेले मानधन ग्रामरोजगार सेवकांच्या खातेवर तात्काळ जमा करावे.

5) प्रवासभत्ता व स्टेशनरी खर्च मिळावा.

6) सामाजिक अंकेक्षण खर्च मिळावा.

7) अपुर्ण कामाचे मस्टर चालु करून ई एमबी करून मिळावे.

8) २० कामांना लॉक असेल तर युक्त धाराआराखडा कशासाठी ?

9) ऑनलाईन कामासाठी रोजगार सेवाकाला स्वतंत्र कंम्प्युटर सेट मिळावा.

10) सन २०२५-२६ जिल्हा रेशीम कार्यालयाकडून तांत्रीक मान्यता मिळून आपल्या कार्यालयास प्राप्त प्रस्तांवाना आपलेकडून प्रशासकिय मान्यता तात्काळ मिळावी.

No comments:

Post a Comment