कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिनोळी, देवरवाडी येथे दक्षता कमिटीकडून जनजागृती - चंदगड लाईव्ह न्युज

12 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिनोळी, देवरवाडी येथे दक्षता कमिटीकडून जनजागृती


शिनोळी येथे जनजागृती करताना दक्षता कमिटीचे सदस्य. 
शिनोळी / प्रतिनिधी
कर्नाटकातील बेळगाव, बेळगूंदी व लगतच्या अन्य गावात कोरोनाच्या सापडलेल्या रूग्णांच्या  पार्श्वभूमीवर  शिनोळी खुर्द येथील  स्थानिक दक्षता समितीचे पोलिस पाटील प्रकाश सुतार,  ग्रामसेवक विठ्ठल नाईक, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांच्यासह कार्यकर्ते बाळासाहेब पाटील, भैरू खांडेकर, प्रताप सुर्यवंशी, सुनिल तुडियेकर,उमेश पाटील,मोहन खांडेकर, उमेशओउळकर,बाळू नाईक,  अनिल केसरकर यांचे समवेत शिनोळी सह संबंधित शेजारील देवरवाडी गावी फेरी काढून जनजागृती केली. या वेळी ध्वनीक्षेपकावरून कोरोनासंबंधित विविध दक्षतेचे आवाहन केले गेले. शिनोळी, देवरवाडीचे पोलीस पाटील जयवंत कांबळे,तसेच दक्षता समितीचे युवा कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. जि.प.सदस्य अरूण सुतार, तलाठी चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली ही जागृती फेरी पार पडली. दरम्यान या दक्षता कमिटीने वीस मोकाट मोटरसायकल स्वारांवर कारवाई करून पोलिसांकडे सुपूर्द केले.


No comments:

Post a Comment