अतिवाड येथील निंगाप्पा कडोलकर यांनी दाखविले माणुसकीचे दर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

12 April 2020

अतिवाड येथील निंगाप्पा कडोलकर यांनी दाखविले माणुसकीचे दर्शन

बेकीनकेरे (ता. जि. बेळगाव) येथे  सीमा बंदी नाक्यावर कर्तव्य बजावणार्या पोलिसांना जेवण देताना निगांप्पा कडोलकर. 
तेऊरवाडी / प्रतिनिधी
संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू आहे .सगळीकडे दिवसागणिक रुगणांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे,कोरो णा वर मात करण्यासाठी प्रत्येक ठिकाणची राज्य सरकारे,आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत.अश्या परिस्थितीत संपूर्ण जनता घरात असताना आरोग्य विभाग आणि पोलीस मात्र बाहेर असून 24 तास आपली सेवा बजावत आहेत.अश्यातच पोलीस प्रशासन मात्र ना ऊन वाऱ्याची ना भुकेची पर्वा करता प्रत्येक राज्याच्या सीमेवर कटाक्षाने लक्ष ठेऊन पहारा देताना दिसत आहे.अश्या सर्व परिस्थितीत त्यांच्या जेवणाचा प्रश्न हा उभा असताना अतिवाड ता.जि. बेळगाव येथील रहिवासी नींगाप्पा आप्पाना कडोलकर यांनी अतिवाड क्रॉस येथे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पहारा देत असलेल्या काकती पोलीस स्टेशन च्या सर्व पोलिसाना गेले 4 दिवस घरून जेवण बनवून देत असून त्यांनी एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपली आहे.अश्या संकटाच्या परिस्थितीत त्यांनी दाखलिलेल्या माणुसकीच्या दर्शनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आम्ही माझ्या सर्व कर्मचाऱ्यासह अतिवाड, बेकिनकेरे येथे राज्याच्या सीमेवर आपली ड्युटी करत असून अतिवाड येथील निंगाप्पा कोकितकर यांनी गेले चार दिवसांपासून आमच्या सर्वांच्या दुपार आणि रात्रीच्या जेवणाची सोय हे करत असून ते आपल्या घरातून जेवण बनवून आणून देऊन एक प्रकारे कोरोना विरुद्धच्या लढाईत आम्ही सुध्दा आपल्या सर्वांबरोबर असून एक प्रकारे कोरोना योध्याची भूमिका बजावत आहेत,तरी अश्याच प्रकारे सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या वर आलेल्या कोरिना च्या संकटाचा सामना करणे गरजेचे आहे,असे मत काकती पोलिस स्टेशन चे प्रमुख पटवर्धन यांनी व्यक्त केले.  

No comments:

Post a Comment