वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोनासाठी पाच हजारांची मदत - चंदगड लाईव्ह न्युज

12 April 2020

वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोनासाठी पाच हजारांची मदत

अथर्व पाटील
कागणी / प्रतिनिधी
मूळचे सलामवाडी (ता. हुक्केरी) येथील रहिवासी व सध्या दुबई येथे मेकॅनिकल इंजीनियर म्हणून कार्यरत असलेले ईश्‍वर  कृष्णा पाटील यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोना विरुद्ध सुरु असलेल्या लढ्या साठी 5 हजार रुपयांची मदत केली. कोरोनाच्या पाशर्वभूमिवर सध्या दुबई येथेही संपूर्ण लॉक डाऊन आहे. याची जाणीव ठेऊन ईश्वर यांच्या अथर्व या या मुलाचा रविवार दी. 12 रोजी तेरावा वाढ दिवस होता. मात्र त्यांनी हा खर्च टाळून सदर रक्कम सलामवाडी येथे मास्क वाटप करण्यासाठी दिली. त्यांच्या या उपक्रमाबद्दल परिसरात कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment