खाऊचे पैसे गड्हिंग्लजचे तहसिलदार दिनेश पारगे यांचेकडे देताना कु. सृष्टी, सोबत नेसरी मंडल अधिकारी सौ.
येसरे
|
कुमरी (ता.गडहिंग्लज) येथील इयत्ता तिसरीत शिकणारी कु. सृष्टी कृष्णा नाईक या विद्यार्थ्यांनीने आपल्या वाढदिवसासाठी वर्षभर साठवलेले पैसे कोरोना विरूद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देवून सर्वसामान्यासाठी एक वेगळाच आदर्श ठेवला आहे केशरी येथे मराठी विद्यामंदिरमध्ये शिकणाऱ्या कु . सृष्टीचा आज 9 वाढदिवस साजरा करण्याची घरी चर्चा चालू होती . वाढदिवस म्हटला की लहान मुलांचा सर्वात मोठा आनंदाचा क्षण,नवनवीन कपडे, चॉकलेट, केक, मित्रपरिवार याची चंगळ. पण या कोरोनाच्या टिव्ही वरील बातम्या बघून सृष्टीने आपल्या वाढदिवसाचा बेत बदलला. वर्षभर खाऊ साठी व वाढदिवसासाठी साठवलेले पैसे कोरोनाच्या लढयासाठी देण्याचा विचार तिने आपल्या आई -वडीलासमोर याबाबत बोलून दाखवला . वाढदिवस पुढच्या वर्षी साजरा करु पण आता हे पैसे मुख्यमंत्री निधिसाठी देण्याचा हटट् धरला. लगेच हा बालहट्ट पूर्ण करण्यासाठी आई वडिलांनी गडहिंग्लजचे तहसिलदार कार्यालय गाठून काटकसरीने वर्षभर जमा केलेल्या पैशाचा बाॅक्स कोरोनाच्या लढाई साठी मुख्यमंत्री साह्यता निधीला दिला. गडहिंग्लजचे तहसीलदार दिनेश पारगे
याच्याकडे हा निधी सुपुर्द केला. चिमुकल्या सृष्टीने दिलेली मदत भलेही कमी असेल पण या तिच्या कृतीतून तीने केलेली मदत आजच्या घडीला लाख मोलाची आहे. सृष्टीने आपल्या वाढदिवसाचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधिला देवून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला.
No comments:
Post a Comment