कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोवाडमध्ये सतर्कता बाळगण्याची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

12 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोवाडमध्ये सतर्कता बाळगण्याची गरज


कोवाड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचे गाव म्हणून कोवाडची सर्वत्र ओळख आहे. कोवाड पासून फक्त आठ किलोमिटर अंतरावर कर्नाटकची हद्द आहे. परिसरातील तीस ते चाळीस गावांचा बाजारपेठेशी संपर्क आहे. सरकारी व खासगी दवाखाने, तसेच औषध दुकानांची संख्या अधिक असल्याने येथील नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगली पाहिजे.
कोवाडसारख्या वर्दळीच्या ठिकाणी एखाद्या कोरोना रुग्णाचा गावात प्रवेश झाल्यास मोठा धोका होण्याची संभावना नाकारता येणार नाही. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने व नागरिकांनी गांभिर्याने कोरोनाबाबत काळजी घेण्याची गरज आहे. गेल्या दहा दिवसापासून बाजारपेठेतील लोकांची होणारी गर्दी पाहिली की सामान्य माणसाच्यात धडकी भरत आहे. शासकीय यंत्रणेसह सर्वानीच हे सहज घेतल्याचे दिसते. पोलिस चौकी, दोन सरकारी बँका, १३ पत संस्था, एक सरकारी दवाखाना, १८ खासगी दवाखाने व १३ औषध दुकाने असल्याने परिसरातील लोकांची आजही अत्यावश्यक सेवा म्हणून येथे ये - जा सुरु आहे. पण बाजारपेठेत येणाऱ्या लोकांची चौकशी करण्याची गरज आहे. नेसरी, गडहिंग्लज, बेळगांव व चंदगड या भागातूनही वाहनांची मोठ्या संख्याने वाहतूक सुरू आहे. बाजारपेठेचे ठिकाण असल्याने येथे लोकांनी रोज ये-जा होत राहणार, त्यावर निर्बंध घालण्याची गरज आहे. जिवनाश्यक वस्तूच्यासाठी शासनाने मुबा दिली असताना त्याचेही काटेकोर पालन होताना दिसत नाही. रात्रीच्यावेळी अजूनही येथे पुणे, मुंबई येथील लोक येत असल्याचे समजते. यातून एखादा रुग्ण या परिसरात आल्यास फार मोठा धोका निर्माण होणार आहे. प्रशासनाकडून नागरिकाना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात असताना येथे मात्र शासकीय आवाहनालाही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

                                                          आओ जावो घर तुम्हारा . . .
कोरोनापासून खबरदारी म्हणून ग्रामीण भागातही अगदी छोट्या गावातूनही खबरदारी घेतली जात असताना कोवाड मध्ये मात्र चित्र वेगळे दिसत आहे. बाहेरून आलेल्या ९० लोकांची यादी केवळ कागदोपत्री आहे. त्यांची स्वतंत्र व्यवस्थाही केली नाही. गावात येणाऱ्या लोकांच्यावर कुठलेही निर्बंध नाहीत . त्यामुळे दिवसा व रात्रीही लोकांचा गावात प्रवेश होत असल्याने धोका निर्माण झाला आहे.


No comments:

Post a Comment