चंदगड तालुका खते बियाणे संघटनेच्या वतीने कृषी विभागाला मास्कचे वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

12 April 2020

चंदगड तालुका खते बियाणे संघटनेच्या वतीने कृषी विभागाला मास्कचे वितरण

कोवाड  / प्रतिनिधी
कोनोच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुका खते बियाणे संघटनेच्यावतीने कृषी विभागाला मास्कचे वितरण करण्यात आले. संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्या हस्ते तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांनी मास्क स्विकारुन कर्मचाऱ्यांच्यासह शेतकऱ्यांच्यापर्यंत मास्क पोहचविण्याच्या सुचना कृषी विभागाला दिल्या. 
राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शासनाकडून नागरिकाना घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले जात आहे. दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तोंडाला मास्क न घालता बाहेर येणाऱ्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर येणाऱ्यांच्या चेहऱ्यावरही मास्क येऊ लागले. काहींच्यावर पोलिसानी कारवाईही केल्या. त्यामुळे चंदगड तालुका खते बियाणे संघटनेनेही शेतकऱ्यांची गरज ओळखून मास्कचे वितरण केले. संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, संजय चिलगोंडे, रामचंद्र बामणे, कृष्णा पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment