चंदगड येथे कॉलेज युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, चंदगडकराना धक्का - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2026

चंदगड येथे कॉलेज युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, चंदगडकराना धक्का

 

दर्शन संभाजी कुंभार

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

    कुंभार गल्ली, चंदगड येथे रविवारी ४ जानेवारी २०२६ रोजी रात्री दर्शन सुतार या एम एस सी पदवीचे शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे चंदगडकरांना मोठा धक्का बसला आहे.

 दर्शन संभाजी कुंभार (वय २३, रा. कुंभार गल्ली, चंदगड) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ धीरज कुंभार (वय २४, रा. चंदगड) यांनी चंदगड पोलिसांत वर्दी दिली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज कांबळे करत आहेत.

 दर्शन हा गडहिंग्लज येथील एका महाविद्यालयाच्या माध्यमातून एमएससी या पदवीच्या वर्षामध्ये शिकत आहे. रविवारी (दि. ४) रात्री ७ नंतर राहत्या घरातच त्याने गळफास घेतला. त्याच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment