चंदगड : सी एल वृत्तसेवा दि.२०-१-२०२६
नागणवाडी (ता चंदगड) येथील बोकुड नावाचे शेतात मंगळवारी दिनांक २० रोजी दुपारी बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनास्थळी वन खात्याचे वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड व वनपाल कृष्णा डेळेकर यांच्यासह विशेष पथकाने पाहणी करून माहिती घेतली. त्यानंतर रात्री गावामध्ये वनखात्याचे पथक गस्त घालत होते. कोणतीही आपत्ती निर्माण होऊ नये, यासाठी गावकऱ्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आले आहेत. सदर बिबट्या हा गंधर्वगड परिसरात आठ दिवसापासून वावर करत असल्याचे स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वी चंदगड - चंदगड नेसरी या राज्यमार्गावर वाळकुळी फाटा येथे गुरुवार (दि. ८) रात्री प्रवाशांन या बिबट्याचे दर्शन झाले होते. बिबट्या या परिसरात फिरत असून नागरिकांनी शेताकडे जाताना सावधानता बाळगावी, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment