![]() |
| गोपाळराव पाटील यांना पेढा भरवून तोंड गोड करताना आमदार शिवाजीराव पाटील |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याचे विश्वस्त व माजी चेअरमन गोपाळराव पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी दौलत सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन अशोक पाटील, हलकर्णी महाविद्यालयाचे व्हा. चेअरमन संजय पाटील, विशाल पाटील, गोविंदराव पाटील, शरद मटकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. यावेळी नामदेव पाटील व रवींद्र बंदिवडेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment