चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड नगरपंचायतीच्या आजच्या दुसऱ्या सभेत बुधवारी दि. २१ रोजी विषय समिती निवडी व समित्यांच्या सभापती निवडी करण्यात आल्या. नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनील काणेकर व नगरपंचायतचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांनी या निवडी जाहीर केल्या. सर्वांत महत्वाच्या स्थायी समितीचे सभापती नगराध्यक्ष असल्याने नगराध्यक्ष सुनील काणेकर हेच या स्थायी समितीचे सभापती आहेत.
चंदगड नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता आहे. यामध्ये नगराध्यक्ष सुनिल काणेकर व भाजपचे ८ नगरसेवक निवडून आले आहेत. तर अपक्ष म्हणून निवडून आलेले अजिंक्य पिळणकर यांनी भाजपला पाठींबा दिला आहे. राजर्षी शाहू आघाडीकडून ८ नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच भाजप व आघाडीकडून प्रत्येकी १ स्विकृत नगरसेवक आहेत.
सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी अंजिक्य पिळणकर, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी माधवी शेलार यांच्या निवडीबद्दल नगराध्यक्ष सुनिल काणेकर यांच्या हस्ते सत्कार झाला.
स्थायी समिती : निवड
नगराध्यक्ष सुनील काणेकर (सभापती), आयेशा नाईकवाडी, अजिंक्य पिळणकर, माधवी शेलार (तिघेही सदस्य )
सार्वजनिक बांधकाम समिती :
अजिंक्य पिळणकर (सभापती), अबूजर मदार (सदस्य).
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती :
माधवी शेलार (सभापती). एकता दड्डीकर व सुचिता कुंभार (दोघीही सदस्या)
महिला व बालकल्याण समिती :
आयेशा नाईकवाडी (सभापती), गायत्री बल्लाळ (उपसभापती).
दरम्यान विषय समिती निवडीमध्ये विरोधकांना डावलल्याने विरोधकांनी सभात्याग करत पत्रकार परिषद घेवून आपली बाजू मांडली.




No comments:
Post a Comment