चंदगड / सी. एल. वृत्तसेवा दि. २१-१-२०२६
चंदगड तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाली होती. जिल्हा परिषदेसाठी आजपर्यंत २७ उमदेवारांनी ४५ अर्ज दाखल केले आहेत. तर पंचायत समितीसाठी ८८ उमेदवारांनी १२२ असे दाखल झाले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी एकू १६७ अर्ज दाखल झालेले आहेत. अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिली.
दाखल झालेल्या अर्जांची छाणनी २२ जानेवारी २०२६ रोजी होणार असून वैध उमदेवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. तसेच २३ ते २७ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज मागे घेण्याचा कालावधी देण्यात आला आहे. २७ जानेवारी २०२६ ला निशाणी वाटप होणार आहे. ५ फेब्रुवारी २०२६ ला मतदान तर ७ फेब्रुवारी २०२६ ला मतमोजणी होणार आहे.
चंदगड तालुक्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट व उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, स्वाभीमानी शेतकरी संघटना, बसपा व मनसे हे गट कार्यरत आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरु होती. सद्यस्थितीला १६७ अर्ज प्राप्त झाले असले तरी छाननी व माघारीनंतर किती अर्ज प्रत्यक्ष निवडणुक रिंगणार असणार यावरुन लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

No comments:
Post a Comment