चंदगड / सी एल वृत्तसेवा
गरीब परिस्थितीमुळे सीए (CA) होण्याचे स्वप्न अपूर्ण राहू नये, यासाठी आई–आबा फाउंडेशनतर्फे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना सीए शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन संपूर्ण खर्च उचलण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. हा उपक्रम दयानंद काणेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य करिअर गाईडन्स कार्यक्रमात जाहीर करण्यात आला.
या कार्यक्रमात Elite Professional Academy चे स्वरूप अमलझरे यांनी CA, CS आणि CMA या व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबत सविस्तर माहिती देत योग्य नियोजन व संधी यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच शिवशंभू अकादमीचे अजित नेवगे यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात भारतीय सैन्यात भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यासोबतच गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची औपचारिक घोषणा करण्यात आली. शिक्षण, शिस्त आणि राष्ट्रसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
या वेळी प्राचार्य आर. पी. पाटील, दयानंद काणेकर, पांडुरंग काणेकर, नगरसेवक सिकंदर नाईक, संजय चदगडकर, प्रथमेश काणेकर, आदित्य काणेकर, एस. व्ही. गुरबे, सिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हा उपक्रम ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारा ठरला असून, समाजातील शिक्षणविषयक जबाबदारीची जाणीव अधोरेखित करणारा कार्यक्रम म्हणून त्याचे कौतुक होत आहे.




No comments:
Post a Comment