संपत पाटील, चंदगड / सी. एल. वृत्तसेवा दि. २०-१-२०२६
चंदगड तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाली होती. जिल्हा परिषदेसाठी आजपर्यंत १० उमदेवारांनी १२ अर्ज दाखल केले आहेत. तर पंचायत समितीसाठी २६ उमेदवारांनी २९ असे दाखल झाले आहेत. अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिली. बुधवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे.
चंदगड तालुक्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट व उबाठा, बसपा हे गट कार्यरत आहेत. अर्ज भरण्याच्या उद्या शेवटचा दिवस असला तरी अजूनही युत्या व आघाड्या फायनल झालेल्या नाहीत. त्यामुळे उमेदवारांसह मतदारांमध्ये संभ्रमावस्था आहे. उद्याच्या एका दिवसात काय राजकीय खलबते होतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद गणातून दाखल झालेले उमेदवारी अर्ज व कंसात पक्ष
अडकूर जिल्हा परिषद गण
१. संजीवनी सुरेश हरेर (अपक्ष)
२. संजीवनी सुरेश हरेर (भाजपा)
३. सौ. राजश्री लक्ष्मण गावडे (भाजपा)
४. माधवी मल्हारी देसाई (भाजपा)
माणगाव जिल्हा परिषद गण
१. सौ. रेणुका प्रकाश नरी
२. सौ. मनीषा अनिल शिवनगेकर
कुदनुर जिल्हा परिषद गण
१. कुमारी प्रचिता प्रभाकर खांडेकर (शिवसेना)
२. अनिता तुकाराम करंबळकर (शिवसेना)
३. ज्योती दीपक पाटील (भाजपा)
४. प्रचिता प्रभाकर खांडेकर (अपक्ष)
तुडये जिल्हा परिषद गण
१. स्वरा सचिन बल्लाळ (भाजपा)
पंचायत समिती गणातून दाखल झालेले उमेदवारी अर्ज व कंसात पक्ष
गवसे पंचायत समिती गण
१. सौ. मनस्विनी महादेव कांबळे (भाजप)
अडकूर पंचायत समिती गण
१. गणेश लहू दळवी (अपक्ष)
२. सुरेश कृष्णा हरेर (अपक्ष)
३. सुरेश कृष्ण हरेर (भाजप)
४. नामदेव भिमान्ना सावंत (शिवसेना)
५. अशोक निंगाप्पा गडदे (भाजपा)
६. शिवदत्त सुभाष कोट (राजश्री शाहू विकास आघाडी)
माणगाव पंचायत समिती गण
१. किरण बसवानीं नाईक (भाजपा)
२. बाबू लक्ष्मण राजगोळकर (शिवसेना)
३. संतोष कृष्णा पाटील (अपक्ष)
४. विलास दत्तात्रय नाईक (अपक्ष)
कोवाड पंचायत समिती गण
१. सौ. सुवर्णा चंद्रकांत कुंभार (भाजपा)
कुदनुर पंचायत समिती गण
१. प्रभाकर मारुती खांडेकर (शिवसेना)
२. विजय रामू भांदुर्गे (अपक्ष)
३. प्रभाकर मारुती खांडेकर (अपक्ष)
४. गजानन तुकाराम सुतार (अपक्ष)
५. धनंजय जोतिबा खवणेवाडकर (भाजपा)
तुर्केवाडी पंचायत समिती गण
१. प्रताप गणपती पाटील (शिवसेना)
२. तानाजी परशराम कागणकर (अपक्ष)
३. गणपती शंकर पवार (अपक्ष)
४. सागर यशवंत सोनार (अपक्ष)
तुडये पंचायत समिती गण
१. सौ. रेशमा परशराम पाटील (भाजपा)
२. राजश्री हर्षवर्धन कोळसेकर (राजश्री शाहू विकास आघाडी)
३. रसिका महेश शिंदे (अपक्ष)
हेरे पंचायत समिती गण
१. संज्योती संतोष मळवीकर (राजश्री शाहू विकास आघाडी)
२. सौ. नंदिनी बळवंत पाटील (अपक्ष)
३. संज्योती संतोष मळवीकर (अपक्ष)
४. स्वाती विनोद पाटील (भाजपा)
५. सुमन जकोबा पाटील (अपक्ष)

No comments:
Post a Comment