अडकूर जिल्हा परिषद गटातून मंगळवारी २० रोजी भाजपतर्फे सौ. राजश्री लक्ष्मण गावडे भरणार अर्ज - चंदगड लाईव्ह न्युज

20 January 2026

अडकूर जिल्हा परिषद गटातून मंगळवारी २० रोजी भाजपतर्फे सौ. राजश्री लक्ष्मण गावडे भरणार अर्ज

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        भारतीय जनता पार्टीतून अडकूर जिल्हा परिषद गटातून सामाजिक कार्यकर्ते, संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे चंदगड तालुकाध्यक्ष व आमदार शिवाजीराव पाटील यांचे खंदे समर्थक लक्ष्मण गावडे यांच्या पत्नी सौ. राजश्री लक्ष्मण गावडे या मंगळवार (ता. २०) रोजी आपला उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालय येथे जमावे असे आवाहन लक्ष्मण गावडे यांनी केले आहे. 


No comments:

Post a Comment