चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
खेडूत शिक्षण मंडळाचे र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड येथे शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता भव्य 'रोजगार मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. कोल्हापूर, पुणे, गोवा आणि बेंगलोर येथील नामांकित कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार असून इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल, फार्मास्युटिकल, इंजिनिअरिंग आणि बँकिंग अशा विविध क्षेत्रांतील रिक्त पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या मेळाव्यासाठी १० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह B.A., B.Com., B.Sc., B.C.A., M.Sc., B.Pharm आणि D.Pharm पदवीधारकांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
सध्या पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेले विद्यार्थी आणि पदवी पूर्ण केलेले सर्व तरुण या संधीचा लाभ घेऊ शकतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये करिअर करण्याची मोठी संधी या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन प्र.प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल आणि प्लेसमेंट ऑफिसर डॉ. आर. एन. साळुंखे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ९४२११०३७६६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

No comments:
Post a Comment