चंदगडच्या शेतकऱ्यांसाठी चंदगड येथे कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करावी - आमदार शिवाजीराव पाटील यांची राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमारजी रावल यांच्याकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

06 March 2026

चंदगडच्या शेतकऱ्यांसाठी चंदगड येथे कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करावी - आमदार शिवाजीराव पाटील यांची राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमारजी रावल यांच्याकडे मागणी

मंत्री जयकुमारजी रावल यांना निवेदन देताना आमदार शिवाजीराव पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी चंदगड येथे कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमारजी रावल यांची भेट घेतली व त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. यावेळी त्यांना चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चंदगड विधानसभेचे आमदार शिवाीराव पाटील यानी निवेदन दिले.

    चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुका हा अति दुर्गम व डोंगराळ भाग आहे. तसेच, महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असून शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला विविध शेतमाल हा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व कृषी मालाच्या वितरणाकरिता शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सोयी-सुविधा व्हावी. त्याचप्रमाणे, याकामासाठी क्षेत्र निहाय स्वतंत्र यंत्रणा असावी या उद्देशाने सक्षम विपणन व्यवस्था म्हणून चंदगड येथे 'कृषी उत्पन्न बाजार समिती' असणे आवश्यक आहे. सध्या अशी व्यवस्था नसल्याने चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल व्यापाऱ्यांना विक्री करावा लागतो किंवा  दूरच्या ठिकाणी असणाऱ्या बाजारपेठेत शेतमाल विक्रीसाठी न्यावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. या सर्व बाबी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावर मंत्री महोदयांनीही सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक तो निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

No comments:

Post a Comment