चंदगड / सी. एल. वृत्तसेवा दि. १९-०१-२०२६
चंदगड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुक लागली आहे. आज अर्ज भरण्याच्या दिवशी केवळ जिल्हा परिषदेसाठी एक अर्ज दाखल झाला आहे. मात्र आतापर्यंत २२२ अर्जांची विक्री झाल्याचे समजते. सोमवारी (ता. १९) रोजी माणगाव जिल्हा परिषद गटातून महिला गटातून मानसी कल्लापा भोगण यांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरण्यासाठी केवल मंगळवार (ता. २०) व बुधवार (ता. २१) असे केवळ दोनच दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांची झुंबड उडण्याची शक्यता आहे. दि. २२ रोजी अर्जांची छानणी होणार आहे.
अद्याप स्थानिक पातळीवर युत्या व आघाड्याबाबतचे चित्र स्पष्ट झाले नसल्याने उमेदवार कार्यकर्त्यांच्यामध्ये उमेदवारीबाबत उत्सुकता आहे. चंदगड तालुक्यातील चारही जिल्हा परिषदेचे आरक्षण हे महिला असल्याने थोडासा उत्साह कमी झाला आहे. मात्र आपल्या घरातील महिलेला निवडणुकीत उभे करुन निवडून आणण्याचा चंग नेतेमंडळींनी बांधल्याचे चित्र पहायला मिळत आहे. येत्या दोन दिवसात अर्ज भरणीसह संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी मात्र आपल्या यंत्रणेचा वापर करुन या अगोदरच सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचार सुरु केला आहे.

No comments:
Post a Comment