चंदगड / सी. एल. वृत्तसेवा दि. १९-१-२०२६
पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेसाठी चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कुलच्या इयत्ता नववीतील हर्षद बामणे व औदुंबर नाडगौडा या दोन्ही विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ही केवळ वैयक्तिक यशाची नाही, तर दि न्यू इंग्लिश स्कूलच्या गुणवत्तेची आणि संस्कारांची साक्ष आहे. कठोर परिश्रम, सातत्य, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी विद्यालयाचे नाव राज्यपातळीवर उज्वल केले आहे, हे खरोखरच अभिमानास्पद!
या दैदीप्यमान यशाबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या यशामागे प्रेरणा देणारे मार्गदर्शक शिक्षक, साथ देणारे पालक आणि प्रोत्साहन देणारे शालेय नेतृत्व खंबीर असल्याचे दिसते. दि न्यू इंग्लिश स्कूलचा विजयाचा प्रवास असाच अविरत सुरू राहील असा विश्वास यावेळी प्राचार्य आर. पी. पाटील यांनी व्यक्त केला आहे.

No comments:
Post a Comment