जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुदनुर येथे चौघावर गुन्हा दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

11 April 2020

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुदनुर येथे चौघावर गुन्हा दाखल


तेऊरवाडी / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हयात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेल्या आदेशांचा भंग केल्याप्रकरणी कुदनुर (ता. चंदगड) येथील चौघांवर विविध कलमाअंतर्गत कोवाड पोलिसानी गुन्हे दाखल केले आहेत.
सध्या सर्वत्र लॉक डाऊन आहे. कुदनुरमध्ये सुद्धा लॉक डाऊन आहे. या गावामध्ये बाहेरगावागून १ एप्रिल नंतर ६ जण आले होते. या सर्वाना ग्रामपंचायत व दक्षता कमिटीने होम कॉरंटाईन केले होते. असे असतानाही हे चौघे जन विनापरवानगी तोंडाला मास्क न बांधता घराबाहेर फिरत होते. यासंदर्भात दक्षता समितीने सुचना देण्याचा प्रयत्न केला असता या सर्वानी याकडे दुर्लक्ष करून सर्व नियमांचा भंग केला. कोवाड पोलिस चौकीचे हेड कॉन्स्टेबल संतोष साबळे यांनी या चौघा विरोधात जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचे उल्लंघन करून लोकांचा जीवितास धोका निर्माण होईल असे वर्तन केल्याप्रकरणी कारवाई करून गुन्हा नोंद केला आहे.


No comments:

Post a Comment