अवकाळी पावसात तडशिनहाळ शाळेला फटका, इमारतीसह डिजिटल क्लासरुमचे नुकसान, शैक्षणिक साहित्यही झाले खराब - चंदगड लाईव्ह न्युज

11 April 2020

अवकाळी पावसात तडशिनहाळ शाळेला फटका, इमारतीसह डिजिटल क्लासरुमचे नुकसान, शैक्षणिक साहित्यही झाले खराब


तुर्केवाडी / प्रतिनिधी
     वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार अवकाळी पावासाने तडशिनहाळ (ता. चंदगड ) येथील प्राथमिक शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये शाळेच्या इमारतीसह शैक्षणिक व खेळाच्या साहित्याची हानी झाली आहे. तर डिजिटल क्लासरुम, रंगमंच, पोषण आहार रुमचेही नुकसान झाल्याची माहिती मुख्याध्यापक तानाजी नाईक यांनी दिली. सदर नुकसानिचा शनिवारी ग्रामपंचायतीच्या वतीने पंचनामा करण्यात आला असून साधारण १ लाख ८५ हजारांचे आर्थिक नुकसान झाल्याचे नाईक यांनी सांगिलते.
       चंदगड तालुक्यात शुक्रवारी (१० एप्रिल) सायंकाळी चारच्या सुमारास ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याचा जोर इतका होता की, अनेकांच्या घराची कौलं, पत्रे उडून गेले. काही ठिकाणी घराच्या भींती कोसळण्याचेही प्रकार घडले. यामध्ये नुकतेच नुतनिकरण करण्यात आलेल्या तडशिनहाळ प्राथमिक शाळेच्या इमारतीचे प्रचंढ नुकसान झाले आहे. त्या नुकसानिचा शनिवारी ग्रामपंचायतीमार्फत पंचनामा करण्यात आला. तलाटी, ग्रामसेवक, पोलिस पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचानी या नुकसानिची पाहणी केली. यावेळी रामलिंग कल्लाप्पा गुरव, नारायण धनाजी दळवी, यल्लाप्पा सिद्राय पाटील, तानाजी तुकाराम नाईक यांनी पंचांचे काम पाहिले.सभापती अनंत कांबळे, बीडीओ ए.बी. जोशी, गटशिक्षणअधिकारी सुमन सुभेदार, तलाठी कोसरे, केंद्रप्रमुख के.ई पाटील, ग्रामसेवक काटे, उपसरपंच रामलिंग गुरव, तंटमुक्त अध्यक्ष नारायण दळवी, पोलिस पाटील भालचंद्र पाटील, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सदर नुकसानिची पाहणी करुन सविस्तर चर्चा केली.
        तडशिनहाळ गावातील प्राथमिक शाळेचे नुकतेच नुतनिकरण करुन डिजिटल क्लासरुम, शैक्षणिक तसेच खेळाचे साहित्य घेण्यात आले होते. शुक्रवारी झालेल्या पावसामध्ये इमारतीसह साहित्याची हानी झाली आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या पंचनाम्यानुसार, लोकसहभागातून बांधलेली डिजिटल क्लासरुम व हॉलवरील पत्रे तसेच पीओपी उडून गेले आहे. त्याचबरोबर शालेय पोषण आहाराच्या रुममधील सिमेंटचेही पत्रे फुटले आहेत. तर कलामंचासही तडे गेले आहेत. शालेय साहित्यामध्ये हार्मोनियम, साऊड सिंस्टिम व ईलेक्ट्रीकल साहित्य खराब झाल्याची माहिती मुख्याध्यापक तानाजी नाईक यांनी दिली.

No comments:

Post a Comment