किणी व्यापारी संघटनेकडून कोरोना ग्रस्तांसाठी आर्थिक मदत - चंदगड लाईव्ह न्युज

11 April 2020

किणी व्यापारी संघटनेकडून कोरोना ग्रस्तांसाठी आर्थिक मदत


तेऊरवाडी / प्रतिनिधी
किणी  (ता. चंदगड) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ताम्रपर्णी नदीकाठावरील  व्यापारी वर्गाने  तहसिल कार्यालयात  १० हजारांचा धनादेश जमा केला. 
गेल्या पावसाळ्यातील महापुराच्या नैसर्गिक आपत्ती मध्ये या व्यापारांचे अतोनात नुकसान होऊन त्यांचा आर्थिक कणाच मोडला होता. पण शासनाने त्यांना आर्थिक सहकार्य केले होते. त्या मदतीच्या आधाराने व्यापारी बांधव थोडेसे सावरत होते. पण कोरोना सारख्या राष्ट्रीय संकटामुळे शासनाने लॉक डाऊन पुकारल्यामुळे गेल्या 25 दिवसापासून सर्व व्यापार्याची दुकाने बंदच आहेत .त्यामुळे पुन्हा आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तरी पण 'एकणदगमेका सहाय करू अवघे धरू सुपंथ' या उक्ती प्रमाणे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल दळवी, सेक्रेटरी संदीप सुतार,दिनकर पाटील,श्रीकांत पाटील या व्यापाऱ्यानी शासनाच्या कोरोना ग्रस्त निधीसाठी तहसीलदार  चंदगड यांच्या नावे रु,10,000 (दहा हजारांचा) धनादेश किणीचे तलाठी विश्वजित कांबळे, सरपंच वसंत सुतार, पोलिस पाटील रणजित गणाचारी यांच्याकडे सुपूर्द केला.स्वतः अडचणीत असून सुद्धा संकटग्रस्तlना सहकार्य करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे  व्यापारी वर्गाचे अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment