देविका बल्लाळ राज्यस्तरीय कोरोना संदेशदुत पुरस्काराने सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2021

देविका बल्लाळ राज्यस्तरीय कोरोना संदेशदुत पुरस्काराने सन्मानित

देविका बल्लाळ

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कोरोना जनजागृती  कोरोनामुक्ती संदेशदुत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धचा पुरस्कार वितरण सोहळा  नुकताच संपन्न झाला. केंद्रीय प्राथमिक शाळा हेरे (ता. चंदगड) येथील विद्यार्थीनी देविका विशाल बल्लाळ हिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

          या स्पर्धेत घोषवाक्य, चित्रकला, शॉर्ट फिल्म, कविता याद्वारे विद्यार्थी व शिक्षकांनी कोरोनामुक्तिचा संदेश राज्यभर युट्यूबच्या माध्यमातून पन्नास हजार लोकांपर्यंत पोहचविला आहे. राज्यभरातुन या  पद्धतीने झालेल्या पुरस्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी नेर येथील गटशिक्षणाधिकारी . मंगेश देशपांडे व या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दारव्हा येथील गटशिक्षणाधिकारी  विलास जाधव उपस्थित होते.देविका बल्लाळ हिला तीच्या वर्गशिक्षीका सौ. वैशाली घोडके,  नंदकुमार रेडेकर (पाटण जि.सातारा) व आईवडील यांचे मार्गदर्शन मिळाले तिच्या या कार्याचे चंदगड तालुक्यात कौतुक होत आहे.
No comments:

Post a Comment