तेऊरवाडी -सी .एल. वृत्तसेवा
राजगोळी बु .ता. चंदगड येथील लक्ष्मी दुध संस्थेसमोरिल वळणावर सोनालिका कंपनिचा ट्रॅक्टर न .Mh.09 CJ 2605 व शाईन मोटर सायकल न Mh 09 EE 5979 यांच्यामध्ये आज सकाळी ८ वाजता झालेल्या अपघातात
मणगुत्ती ता . हुक्केरी , जि. बेळगाळ येथील वंदना सुरेश भागुले (वय -५० ) या महिलेचा जागीच मृत्यू झाला . यासंदर्भातील फिर्याद योगेश भादुले यानी चंदगड पोलीसात दिली आहे .
अधिक माहिती अशी , फिर्यादी योगेश व त्याची आई वंदना ह्या राजगोळी वरून मणगुती येथे जात होत्या . त्यावेळी येथील दूध संस्थेच्या वळणावर समोरून येणाऱ्या दोन ट्रॉली ट्रॅक्टरच्या उजव्या बाजूला दूचाकीचा हँडल लागुन गाडी खाली पडली. गाडीवर पाठीमागे बसलेली वंदना हिच्या डोकीवरून ट्रॅक्टर चे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला .ट्रॅक्टर चालक सुनिल गणपती मोरे रा. राजगोळी खुर्द यांच्या विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पो.हे .कॉ. चव्हाण करत आहेत .
No comments:
Post a Comment