संघर्ष करून पीएचडी मिळवली, पण कोरोनाची लढाई जिंकण्यात अपयश, चंदगडमधील तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2021

संघर्ष करून पीएचडी मिळवली, पण कोरोनाची लढाई जिंकण्यात अपयश, चंदगडमधील तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू

 

मारुती नागोजी पाटील

चंदगड / प्रतिनिधी

     प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून पीएचडी मिळवलेल्या कोल्हापूर येथील मारुती नागोजी पाटील या तरुण प्राध्यापकाचा कोरोनाशी लढताना अखेर मृत्यू झालाय. मारुती पाटील हे अवघ्या 38 वर्षांचे होते. 

   मारुती पाटील यांचे मूळगाव कर्नाटकमधील मणिकेरी असूनही महाराष्ट्रात स्वतःच शिक्षण पूर्ण करून त्यांनी इतिहास या विषयात पीएचडी डिग्री मिळवली होती. घरची परिस्थिती बेताची असतानाही कोल्हापूर शहरात राहून त्यांनी स्वतःच शिक्षण पूर्ण केलं होतं. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून त्यांनी इतिहास विषयात पीएचडी ही पदवी ग्रहण केली होती. गेल्या दीड महिन्यापासून ते कोल्हापूर शहरातल्या सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र उपचारांना यश न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यात असणाऱ्या कौलगे गावात त्यांनी त्यांचं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले होते. सध्या ते कोल्हापुर शहरात प्राध्यापक म्हणून काम करत होते. दीड महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र एवढ्या दिवसांच्या उपचारांनाही यश मिळाले नाही. त्यांच्या पश्चात त्यांचे आई वडील आणि छोटासा परिवार असून त्यांच्या अश्या अकाली एक्झिटमुळे सगळ्यांनाच धक्का बसलाय.





No comments:

Post a Comment