विजया हॉस्पिटल कडून पंचवीस हजारांच्या चंदन रोपांचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2021

विजया हॉस्पिटल कडून पंचवीस हजारांच्या चंदन रोपांचे वाटप


सुरुते येथे चंदन रोपे भेट प्रसंगी वृक्षारोपण करताना ग्रामस्थ व विजया हॉस्पिटल स्टाफ.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        विजया ऑर्थो अँड ट्रामा सेंटर, बेळगाव यांच्या वतीने सुरुते (ता. चंदगड) गावासाठी पंचवीस हजार रुपयांची चंदन वृक्ष रोपे वाटप करण्यात आली.

        कोरोना सारख्या जागतिक महामारीमुळे माणूस  ऑक्सिजन अभावी आपले प्राण गमावत आहे. यानिमित्ताने झाडांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ऑक्सिजन अभावी आपले जिवलग तडफडून प्राण सोडत आहेत. ही परिस्थिती टाळण्यासाठी 'झाडे लावू झाडे जगवू वातावरणातील ऑक्सीजन वाढवू.'  हा संदेश घेऊन विजया हॉस्पिटल चे सर्वेसर्वा  डॉ.रवी पाटील यांनी सुरुते ग्रामपं च्या सहकार्याने ग्रामस्थांना चंदनाची रोपे भेट दिली. यावेळी हॉस्पिटलचे संपर्क अधिकारी विरेश हिरेमठ यांनी पर्यावरण व आरोग्य बाबत मार्गदर्शन केले. पर्यावरण व वृक्ष प्रेमी डॉ. रवी पाटील यांचा उपक्रम स्तुत्य आणि कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार सरपंच मारुती पाटील व उपसरपंच नागोजी नाईक यांनी व्यक्त केले.

        यावेळी पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, तरुण मंडळ कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामसेवक विनय संभाजी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment