नेसरी / सी. एल. वृत्तसेवा
नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील मीनाताई ठाकरे दूध संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव हिडदुगी यांनी आवाहन केलेल्या शेणी व लाकडे दान उपक्रमास नेसरी व परिसरातून मोठा प्रतिसाद लाभत असून गडहिंग्लज स्मशानभूमीसाठी ३००० शेणी व लाकडे नुकतीच पाठवन्यात आली.
नगरसेवक बंटी उर्फ महेश कोरी यांनी या साहित्याचा स्वीकार करून आगदी ऐनवेळी शेणी मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. यावेळी शिवाजीराव हिडदुगी व अॅड. संदीप फगरे यांनी मनोगते व्यक्त करून मयत कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्याचे धाडसी व पवित्र काम करत असलेबद्दल महेश कोरी व त्यांच्या टीमचे कौतुक केले. यावेळी संदीप रिंगणे, रवींद्र हिडदुगी, कृष्णा पाटील, आनंद गिरी, बाळू पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान सरोळीचे सरपंच मारुती पाटील, सावतवाडी तर्फ नेसरीचे सरपंच धोंडीबा नांदवडेकर व अर्जूनवडीचे सरपंच शामराव नाईक यांच्यासह प्रकाश देसाई, शिवाजी पाटील व ग्रामस्थांनी यासाठी मदत केल्याचे सांगण्यात आले. उर्वरित गावातही जाऊन साहित्य गोळा करण्याचे काम चालू करण्याचे नियोजन सुरू आहे.
सदर साहित्य गोळा करण्यासाठी येथील युवा कार्यकर्ते सौरभ हिडदुगी, ऋषिकेश गाडवी, हर्षवर्धन हिडदुगी, , संदेश हिडदुगी, श्रीशैल मठपती, प्रणव कोरी, विराज हिडदुगी, रोहित मठपती, शुभम हिडदुगी आदेि परिश्रम घेत आहेत. या पावित्र कार्यासाठी ग्रामस्थांनी जास्तीतजास्त शेणी व लाकडे दान करून या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन शिवाजी हिडदुगी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment