गरिबांचा नेता, चंदगडच्या हरितक्रांतीचे जनक, माजी मंत्री भरमूआण्णा यांचा शनिवार दि.१७ रोजी कार्वे येथे वाढदिवस - चंदगड लाईव्ह न्युज

16 January 2026

गरिबांचा नेता, चंदगडच्या हरितक्रांतीचे जनक, माजी मंत्री भरमूआण्णा यांचा शनिवार दि.१७ रोजी कार्वे येथे वाढदिवस

 

भरमुआण्णा सुबराव पाटील

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

       चंदगड तालुक्याच्या हरितक्रांतीचे व धवल क्रांतीचे जनक गरिबांचा नेता, लोकनेते, महाराष्ट्र राज्याचे माजी रोजगार हमी योजना राज्यमंत्री भरमुआण्णा सुबराव पाटील यांचा उद्या शनिवार दि. १७ जानेवारी २०२६ रोजी ९० वा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. स्वराज्य मल्टीपर्पज हॉल मजरे कार्वे (बेळगाव वेंगुर्ले रोड) ता. चंदगड येथे दुपारी १२.०० वाजता होणाऱ्या आण्णा प्रेमी कार्यकर्ते आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कागलचे माजी आमदार संजयबाबा घाटगे भूषवणार आहेत.

   भरमूआण्णा यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार ना. प्रकाश आबिटकर (पालकमंत्री कोल्हापूर व सार्वजनिक आरोग्य मंत्री महाराष्ट्र), राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, चंदगडचे लोकप्रिय आमदार शिवाजीराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी (माजी आमदार उचगाव- बेळगाव), नाथाजी पाटील (जिल्हाध्यक्ष कोल्हापूर भाजप) हे उपस्थित राहणार आहेत.

  या कार्यक्रमास चंदगड तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन भरमूआण्णा व आमदार शिवाजीराव भाऊ प्रेमी, चंदगड तालुका आजी-माजी सैनिक संघटना, सर्व शिक्षक संघटना, भाजप पक्षाच्या सर्व सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस व पदाधिकारी, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत, सेवा संस्था, दूध संस्था पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ बसर्गे-गौळवाडी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment