चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड आगाराच्या वतीने प्रवाशांची गैरसोय टोळण्यासाठी बेळगाव - हाजगोळी बस सेवा सुरु झाली आहे. बेळगाववरून सायंकाळी साडेपाचला हि बस सुटणार आहे. या सेवेमुळे तुडये हाजगोळी येथील नागरिकांची मोठी सोय झाली आहे. ही बस हाजगोळीला येऊन परत वस्तीला सुरुते येथे जाणार आहे. सकाळी ती सुरुतेहून ढेकोळी, सरोळी, तुडये वरून हाजगोळी व नंतर हाजगोळी ते शिनोळी मार्गे हलकर्णी व नंतर हलकर्णी ते हाजगोळी व कोलीक अशी फेरी राहणार आहे.
हाजगोळी येथे या बसचे पूजन करण्यात आले. सरपंच शीतल पवार यांनी पूजन केले. उपसरपंच दिपक पाटील, गोपाळ शिंदे यांच्या हस्ते चालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य तुकाराम शिंदे यानी गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. सह्याद्री को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे संचालक हर्षवर्धन कोळसेकर यांनी आंदोलनामुळे कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्हीही राज्याच्या बस सेवा सुरु झाल्याने विध्यार्थी तसेच नागरिकांची मोठी सोय झाल्याचे सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या शारदा सुतार, संभाजी कांबळे, रवळू शिंदे, विनायक पवार, शिवाजी सुतार, लक्ष्मण पाटील, निलेश पाटील, अनुराधा शिंदे, शिवाजी पवार, राजू कांबळे, संजय दळवी, ज्ञानेश्वर गावडे, तानाजी पाटील, भरमू नाकाडी, नामदेव नाकाडी, अशोक पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment