चिंचणे कामेवाडी जंगलात शिकारीसाठी आलेल्या कर्नाटकातील दोन संशयित शिकाऱ्यांना अटक - चंदगड लाईव्ह न्युज

13 January 2026

चिंचणे कामेवाडी जंगलात शिकारीसाठी आलेल्या कर्नाटकातील दोन संशयित शिकाऱ्यांना अटक

 

पकडण्यात आलेले संशयित

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

    पाटणे (ता. चंदगड) वनपरिक्षेत्रातील परिमंडळ कार्वे अंतर्गत येणाऱ्या नियतक्षेत्र चिंचणे कामेवाडी जंगल विभागात गस्त घालत असताना वनखात्याच्या पथकाला कर्नाटकातील सौंदती तालुक्यातील दोघेजण  शिकारीचे सापळे लावत असताना रंगेहात सापडले. यामध्ये बसाप्पा निगाप्पा देवरमणी (वय ५० वर्ष, रा. बुदनूर ता. सौदत्ती जि. बेळगाव) व सुरेश बसाप्पा देवरमणी (वय २५ वर्ष, रा. बुदनूर ता. सौदत्ती जि. बेळगाव) यांचा समावेश आहे. 

यासंदर्भात वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी - वरील संशयित दोघेजण चिंचणे कामेवाडी जंगल विभागात गस्त घालत असताना वनखात्याच्या पथकाला कर्नाटकातील सौंदती तालुक्यातील दोघेजण  शिकारीचे सापळे लावत असताना रंगेहात सापडले. या दोघांनी लावलेले सापळे (फासकी)-७, कोयता-१ व व्हीवो कंपनीचा मोबाईल-०१ मुददेमाल जप्त करून ताब्यात घेतला. दि. १२-०१-२०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता गुन्हा नोंद केला आहे. संशयितांना तीन दिवसाची वन कोठडी सुनावली आहे.

        सदर कारवाई उपवनसंरक्षक, कोल्हापुर धैर्यशिल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पाटणे, शितल पाटील, वनपाल जॉन्सन डिसोजा व नेताजी धामणकर व वनरक्षक साक्षी सपकळ, पुनम मदने, देवेश्वर रावलेवाड, सागर पाटील, खंडु कोरे, अलका लोखंडे, शिवाजी कांबळे, चंद्रकांत बांदेकर, अमित माने, पास्कल डिसोजा व वाहन चालक विश्वनाथ नार्वेकर व शुभम बांदेकर व वन्यजीव बचाव पथक कर्मचारी बसवाणी नाईक केली.

No comments:

Post a Comment