चंदगड : सी एल वृत्तसेवा
मूळचे तुडये (ता. चंदगड) व सध्या भाग्यनगर अनगोळ, बेळगाव येथील रहिवाशी गजानन दिनकर हुलजी (वय ४७) यांचे हृदयविकाराने मंगळवारी (दि. १३) जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या अचानकपणे जाण्याने तुडये परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी भाऊ, भावजय, आई असा परिवार आहे. त्यांच्यावर बुधवारी दिनांक १४ सकाळी नऊ वाजता तुडये येथे अंत्यविधी होणार आहे. गजानन हे उद्यमबाग, बेळगाव येथील समृद्धी हार्डवेअर व स्पेअरपार्ट सेल्सचे मालक होते. चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती जगन्नाथ हुलजी यांचे ते मोठे बंधू होत. गजानन यांच्या अचानकपणे जाण्याने तुडये परिसरावर शोककळा पसरली आहे.

No comments:
Post a Comment