दुंडगे ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक सुतार यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

13 January 2026

दुंडगे ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक सुतार यांचे निधन

  

पुंडलिक तुकाराम सुतार

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

    मूळचे दुंडगे व सध्या हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथील रहिवाशी व भारतीय सैन्य दलाच्या २ मराठा मधून निवृत्त झालेले हवालदार पुंडलिक तुकाराम सुतार (वय ५०) यांचे हृदयविकाराने सोमवारी दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी जावई भाऊ असा परिवार आहे. ते दुंडगे ग्रामपंचायत सदस्य होते. तर तंटामुक्त कमिटीचे उपाध्यक्ष रामा सुतार यांचे ते पुतणे होत. रक्षा विसर्जन गुरुवारी दि. १५ सकाळी ८ वाजता होणार आहे. हलकर्णी फाटा येथील प्लायवूड दुकानचे ते मालक होते.

No comments:

Post a Comment